गणोशभक्तांना खूशखबर ! स्ट्रिंग-रेचा धोका नाही

By Admin | Updated: September 5, 2014 01:26 IST2014-09-05T01:26:24+5:302014-09-05T01:26:24+5:30

अनंत चतुर्दशीला गणोश विसजर्नासाठी जाणा:या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Ganosh Prakashan happy! There is no risk of string-ray | गणोशभक्तांना खूशखबर ! स्ट्रिंग-रेचा धोका नाही

गणोशभक्तांना खूशखबर ! स्ट्रिंग-रेचा धोका नाही

मनोहर कुंभेजकर - मुंबई
अनंत चतुर्दशीला गणोश विसजर्नासाठी जाणा:या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या मुंबईच्या बीचेसला स्ट्रिंग-रे माशांचा धोका नसल्याचा निर्वाळा मत्स्य व्यवसाय खात्याचे सहआयुक्त विनोद नाईक यांनी दिला आहे. ‘लोकमत’ने ‘जेली फिशची भीती नको, पण उपाययोजना करा’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, मत्स्य व्यवसाय खाते घेत असलेल्या उपाययोजनांची माहिती देत स्ट्रिंग-रे माशांविषयीची भूमिका मांडली.
गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी सुमारे 7क् जणांना स्ट्रिंग-रे माशांनी करकचून चावा घेतला होता. त्यानंतर मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून मत्स्य व्यवसाय खात्याने गणपतीपूर्वीच 25 ऑगस्टपासून गिरगाव, दादर, जुहू आणि अक्सा या किना:यांवर स्थानिक कोळी बांधवाच्या मदतीने समुद्रात जाळी टाकून स्ट्रिंग-रे किंवा जेली फिश आहेत का? याची चाचपणी केली होती. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पालिकेच्या वतीने स्ट्रिंग-रे, जेली फिश समुद्रकिनारी आहेत का? याची पाहणी मत्स्यव्यवसाय खात्याने करावी, असे पत्रच पाठवल्याचे त्यांनी सांगितले. स्ट्रिंग-रे सध्या तरी मुंबईच्या किना:यांवर नसल्याचा अहवाल पालिकेच्या आपत्कालीन विभागाला  देत असल्याची माहितीही नाईक यांनी दिली. 
 
..समुद्रात उतरणो टाळा
मत्स्य व्यवसाय खात्याचे एकूण 8 कर्मचारी आणि स्थानिक कोळी बांधवांनी केलेल्या पाहणीत या चारही किना:यांवर गेल्या 3-4 दिवसात स्ट्रिंग-रे मासे आढळून आलेले नाहीत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून येणा:या अनंत चतुर्दशीला विसर्जनावेळी गरजेपेक्षा जास्त गणोशभक्तांनी समुद्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणोशभक्तांनी विसजर्नासाठी स्थानिक कोळीबांधव आणि पालिकेच्या जीवरक्षकांची मदत घ्यावी, 
असे आवाहनदेखील विनोद नाईक यांनी केले आहे. 

 

Web Title: Ganosh Prakashan happy! There is no risk of string-ray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.