Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘एस्कॉर्ट’ सेवा देणाऱ्या २३ वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार; मुंबईतील मालाडमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 19:09 IST

मुंबई : एस्कॉर्टिंग सेवेत काम करणाऱ्या २३ वर्षीय महिलेवर मालाडमध्ये तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेला एका आरोपीने ...

मुंबई : एस्कॉर्टिंग सेवेत काम करणाऱ्या २३ वर्षीय महिलेवर मालाडमध्ये तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेला एका आरोपीने १० हजार रुपये देत एका रात्रीसाठी कामावर ठेवले होते. मात्र, ती जेव्हा त्याच्या घरी गेली तेव्हा तिला तेथे तीन पुरुष आढळले ज्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून दोघे पसार झाले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटमध्ये तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेचा त्यांच्या आपत्कालीन क्रमांकावर कॉल आला. याची माहिती मालाड पोलीस ठाण्यात कार्यरत निर्भया पथकाचे अधिकारी मदतीसाठी तत्काळ उल्लेखित ठिकाणी पोहोचले. त्यानंतर महिलेची सुटका करण्यात आली. तर एका व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. तपासादरम्यान तक्रारदार महिला एस्कॉर्ट सेवेसाठी काम करीत असल्याचे आढळून आले.

पीडितेने तिच्या जबानीत म्हटले आहे की, तिला आरोपींनी एका रात्रीसाठी १० हजार रुपये देत कामावर ठेवले होते. त्यानुसार, ती शुक्रवारी रात्री मीरा रोड येथून मालाडमधील घरी गेली आणि तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिने पैसे मागितले तेव्हा आरोपीने तिला फक्त १० हजार रुपये दिले. तेव्हा तिने आणखी पैशांची मागणी केली असता त्यांनी नकार देत तिला घरातून जाण्यास सांगितले. शनिवारी, तिने पोलिसांना फोन केला तेव्हा तीन आरोपींनी तिला जबरदस्तीने घरातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, असे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे.

आम्ही सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे आणि जोबराज यादव नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे, इतर दोन सुनील गिरी आणि सुनील साहू फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :लैंगिक छळलैंगिक शोषणमुंबईपोलिस