Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 10:22 IST2025-12-15T10:20:04+5:302025-12-15T10:22:25+5:30
Kandivali Police Attack: मुंबईतील कांदिवलीमध्ये पोलिसांना गुंडांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
Kandivali Crime: आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी गुंडांनी पोलिसांनाचीच कॉलर पकडत हुज्जत घातली. पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांवरच गावगुंडांनी हल्ला केला. पोलिसांना गुंडांकडून मारहाण करण्यात आली. कांदिवलीमध्ये रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कांदिवली पश्चिममधील एकता नगरमध्ये दोन गटामध्ये हाणामारी सुरू होती. पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक एकता नगरमध्ये पोहोचले. दोन गटातील वाद थांबवून आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतानाच काही गुंडांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला.
पोलीस अटक करण्यासाठी जात असताना काही गुंड त्यांना अडवू लागले. इतकंच नाही, तर काही पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना कारवाई करण्यापासून रोखण्यात आले. काही कर्मचाऱ्यांना गुंडांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकारही घडला.
कांदिवलीमध्ये पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली पश्चिम एकता नगरमध्ये, मारामारीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी हल्ला केला.#Crimenews#Mumbainews#police#kandiwalipic.twitter.com/C3xn2MZc7s
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) December 15, 2025
घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची माहिती मिळताच आणखी पोलीस कर्मचारी पाठवण्यात आले. एकता नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली.
काही व्हिडीओमध्ये पोलीस आरोपींना पकडण्यासाठी जात असताना गुंड त्यांना पकडताना दिसत आहेत. काहींनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. त्यामुळे गुंडांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही? असा प्रश्नही या घटनेने अधोरेखित होत आहे.