गणेशोत्सव आता 'राज्य महोत्सव'; मंडळांना १० कोटी रुपयांची बक्षिसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:18 IST2025-08-28T13:18:33+5:302025-08-28T13:18:53+5:30
Mumbai News: राज्य सरकारने गणेशोत्सवाला यंदापासून 'राज्य महोत्सव'चा दर्जा दिला आहे. राज्यभर साजरा होणाऱ्या या उत्सवाला शासनाने अधिकृत मान्यता देत विविध योजनांची घोषणा केली आहे.

गणेशोत्सव आता 'राज्य महोत्सव'; मंडळांना १० कोटी रुपयांची बक्षिसे
मुंबई - राज्य सरकारने गणेशोत्सवाला यंदापासून 'राज्य महोत्सव'चा दर्जा दिला आहे. राज्यभर साजरा होणाऱ्या या उत्सवाला शासनाने अधिकृत मान्यता देत विविध योजनांची घोषणा केली आहे.
नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून दीड कोटी रुपयांचे अनुदान, तर तालुका ते राज्यस्तरावर होणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धासाठी तब्बल १० कोटी रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. यात पारंपरिक सांस्कृतिक उपक्रमांसोबतच आधुनिक उपक्रमांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची जपणूक होणार आहे.
'राज्य महोत्सवा'चा दर्जा दिल्याने असा फायदा
गणेशोत्सव आता केवळ धार्मिक १ उत्सव न राहता तो अधिकृत सांस्कृतिक उत्सव साजरा केला जाईल. यामुळे ग्रामीण ते शहरी स्तरावर पारंपरिक कला, भजन, नृत्य, नाट्य, लोककला यांना प्रोत्साहन मिळेल. तर, कलाकार, मूर्तिकार, लाइटिंग-डेकोरेशन उद्योग, साउंड, स्टेज, पर्यटन सेवा यांना आर्थिक चालना मिळेल.
...असा नोंदवा सहभाग
पु. ल. देशपांडे अकादमीच्या संकेतस्थळावर केवळ नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक गणेश मंडळांना अर्ज करता येईल. सहभागी होणाऱ्या मंडळांना गत वर्षांच्या ते यंदाच्या अनंत चतुर्दशीपर्यंतचा अहवाल द्यावा लागेल.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने सांस्कृतिक वारसा, पर्यावरणपूरक उपक्रम, कला- साहित्य व आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगमातून उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांची प्रतिष्ठा वाढणार असून, ग्रामीण ते शहरी स्तरावर गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्साह नवी उंची गाठेल.
- सदानंद लाड, अध्यक्ष, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ
सांस्कृतिक कार्यक्रम
संगीत, नृत्य, भजन, कीर्तन, आरती स्पर्धा, दशावतार, पोवाडा, लावणी, खडिगम्मत, झाडीपट्टी, वहिगायन, चित्रकला, मूर्तिकला, शास्त्रीय, लोकसंगीत व वाद्यवृंद सादरीकरण, समाजप्रबोधनपर एकांकिका, लोकनाट्य, वगनाट्य, हास्य-नाट्य, विनोदी प्रयोग, बक्तत्व वातविद्वात भाती