Join us

Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:32 IST

Ganeshotsav 2025 Special Train for Konkan: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. 

Ganeshotsav 2025 Special Train: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वेबरोबर पश्चिम रेल्वेनेही दिलासा दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पश्चिम रेल्वेकडून विशे रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, मुंबई सेंट्रल, वांद्रे येथील रेल्वे स्थानकावरून या गाड्या सुटणार आहेत. या गाड्यांसाठीचे तिकीट बुकिंग २३ जुलैपासून सुरू होणार आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात जातात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गर्दीमुळे प्रवाशांची प्रचंड हेळसांड होते. गर्दीच्या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेकडून तीन विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. 

कोणत्या ट्रेन चालवणार आणि कोणत्या मार्गावरून धावणार?

०९०११ मुंबई सेंट्रल - ठोकूर (प्रथम फेरी: २६ ऑगस्ट) – दर मंगळवारी.

०९०१९ मुंबई सेंट्रल - सावंतवाडी (प्रथम फेरी: २२ ऑगस्ट) – बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.

०९०१५ बांद्रा टर्मिनस - रत्नागिरी (प्रथम फेरी: २१ ऑगस्ट - विशेष भाड्याची गाडी) – दर गुरुवारी.

या रेल्वे गाड्यांसाठी आरक्षण २३ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे. आयआरसीटीसी आणि आरक्षण केंद्रावर या गाड्यांचे बुकिंग करता येणार आहे.   मध्य रेल्वे-कोकण रेल्वेही विशेष गाड्या सोडणार

मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विशेष साप्ताहिक रेल्वेगाड्या चालवणार आहे. २५ जुलैपासून तिकीट आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस, मडगाव (०११८५/०११८६) ही विशेष गाडी २७ऑगस्ट व ३ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून मध्यरात्री ००,४५ वाजता सुटेल व त्याचदिवशी दुपारी ०२.३० वाजता मडगावला पोहोचेल परतीची मडगावहून सायंकाळी ०४.३० वाजता निघून दुसन्या दिवशी पहाटे ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

या गाडीमध्ये २१ एलएचबी डबे असून, सर्व प्रमुख कोकण स्थानकांत थांबे असतील. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस, सावंतवाडी रोड (०११२९/०११३०) ही गाडी २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर व ९ सप्टेंबर रोजी सकाळी ०८.४५ वाजता सुटेल व रात्री १०.२० वा. सावंतवाडीत पोहोचेल.

विशेष रेल्वे गाडीला २२ डबे

लोकमान्य टिळक टर्मिनस, सावंतवाडी रोड़ गाडीला २२ डब्यांची रचना असून, थांबे कोकणातील प्रमुख स्टेशनवर असतील, पुणे- रत्नागिरी विशेष गाडी (०१४१४४/०१४४६) आणि (०१४४७य०१४४८) अनुक्रमे मंगळवार व शनिवार (२३, २६, ३० ऑगस्ट व २,६, ९ सप्टेंबर) रोजी रात्री १२.२५ वाजता पुणे स्थानकावरून सुटतील आणि सकाळी ११.५० वाजता रत्नागिरी येथे पोहचेल.

परतीचा प्रवास सायं. ०५.५० वा. सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सा. ५ ला पुण्याला होईल, थांचे लोणावळा, कर्जत, पनवेलसह कोकणातील स्थानकांवर असतील, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी सांगितले.

टॅग्स :भारतीय रेल्वेकोकण रेल्वेकोकणरेल्वे