Ganeshotsav 2022 Rules: मंडपाजवळ खड्डे दिसले तर गणेश मंडळाला प्रतिखड्डा २ हजारांचा दंड! BMCची गणेशोत्सवासाठी नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 20:26 IST2022-08-21T20:25:37+5:302022-08-21T20:26:46+5:30
मुंबई (BMC) पालिकेने जारी केली गणेशोत्सवासाठी नियमावली

Ganeshotsav 2022 Rules: मंडपाजवळ खड्डे दिसले तर गणेश मंडळाला प्रतिखड्डा २ हजारांचा दंड! BMCची गणेशोत्सवासाठी नियमावली
Ganeshotsav 2022 Rules, Mumbai BMC: गेली दोन वर्षे कोविडमुळे निर्बंधामध्ये सण-उत्सव साजरे केल्यानंतर आता यंदा मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडी जोरात साजरी झाली. त्या पाठोपाठ आता ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवदेखील सुरू होणार आहे. ३१ तारखेला बाप्पाच्या आगमनाची वाट सारेच भाविक पाहत आहेत. अशात निर्बंध नसले तरी गणेशोत्सवासाठीमुंबई महापालिकेकडून (BMC) काही नियमावली जारी करण्यात आली आहे. गणेश मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.
या नियमावलीनुसार गणेश मंडळांना सर्व नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मंडप उभारताना तो मंडप ३० फुटांपर्यंत असावा. त्यापेक्षा मोठा नसावा. २५ फुटांपेक्षा उंच मंडप असल्यास मंडप बांधणीचा अहवाल पालिकेला सादर करणे गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असणार आहे. मंडप परिसरातील रस्त्यांवर खड्डे आढळल्यास संबंधित मंडळाला प्रति खड्डा २,००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
अशी आहे नियमावली-
१. मंडपाची उंची 30 फुटांपर्यंतच ठेवणे बंधनकारक असेल.
२. मंडप परिसरात खड्डे आढळल्यास २ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.
३. मंडपामध्ये कोणताही स्टॉल उभारता येणार नाही.
४. २५ फुटांवरील मंडपांचे बांधणी अहवाल सादर करणे बंधनकारक असेल.
५. पीओपीच्या गणेशमुर्तींवर उंचीच्या मर्यादेचे बंधन नसेल.
६. प्रतिबंधीत जाहिराती मंडपात लावल्यास कारवाई होईल.
७. साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेता स्वच्छतेची जबाबदारी गणेश मंडळांची असेल.
८. स्पीकर, डीजेच्या आवाजाची डेसीबल मर्यादा पाळणे बंधनकारक असेल.