अ‍ॅसिड हल्ल्याची शिकार ठरलेल्या महिलांकडून गणेशाची सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 02:23 AM2018-09-09T02:23:37+5:302018-09-09T02:23:55+5:30

अ‍ॅसिड हल्ल्याची शिकार ठरलेल्या पीडित महिला यंदा गणेशाची सजावट करणार आहेत.

Ganesha decorations by women who have been attacked by acid attacks | अ‍ॅसिड हल्ल्याची शिकार ठरलेल्या महिलांकडून गणेशाची सजावट

अ‍ॅसिड हल्ल्याची शिकार ठरलेल्या महिलांकडून गणेशाची सजावट

Next

मुंबई : अ‍ॅसिड हल्ल्याची शिकार ठरलेल्या पीडित महिला यंदा गणेशाची सजावट करणार आहेत. डिलाइल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
महिलांवर होणारे ‘अ‍ॅसिड हल्ले’ आणि वाढते ‘तापमान’ या दोन संकल्पनांवर आधारित हा उपक्रम असून कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. वर्षापूर्वी अ‍ॅसिड हल्ल्याची शिकार ठरलेल्या स्नेहा जावळे आणि सिया पारकर, तसेच काही अंध मुली या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. देखावे उभे करण्यासाठी विजेचा दुरुपयोग टाळण्यासाठी, प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारा पर्यावरणाचा ºहास याकडे लक्ष देऊन नवीन कल्पकता यात मांडली आहे. त्यांनी सजविलेल्या एकूण आठ गणपतींपैकी चार गणपती पर्यावरणावर आणि चार गणपती मानवी स्वभावावर भाष्य करणारे आहेत. ‘संजीवनी : सुरक्षेची हमी’ या टॅगलाइनसह ‘चेहरा जळालाय, पण स्वप्ने जळाली नाहीत’ असे सांगणाऱ्या धाडसी महिलांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी मंडळ
प्रयत्न करत आहे.
>आठ गणेशमूर्ती तयार
सुमित पाटील यांनी सांगितले की, पर्यावरण आणि हिंसा या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून इकोफ्रेंडली सजावट करण्यात आली आहे. झाडांची कत्तल, प्रदूषण, विजेचा दुरुपयोग, हिंसक वृत्ती आणि हव्यासापोटी केली जाणारे हिंसा यावर कलात्मक सजावट साकारली आहे. ‘मुंबईचा राजा’च्या मूर्तीभोवती माचिसकाडी, मेणबत्ती, शेण-डिंक, पृथ्वीवरील नैसर्गिक ऊर्जा असलेल्या वस्तू, कापड-लोकर, माती, कागदाचा लगद्यासह आरसा या गोष्टींचा वापर करत वेगवेगळे संदेश देणाºया आठ गणेशमूर्ती येथे साकारण्यात आल्या आहेत.
>संजीवनी अ‍ॅपची निर्मिती
महिलांच्या सबलीकरणासाठी ‘संजीवनी’ अ‍ॅप निर्माण करण्यात आले आहे. हे अ‍ॅप इंटरनेटशिवाय वापरता येणार असून, मंडळात येणाºया प्रत्येक महिलांच्या मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून दिले जाणार आहे. यात पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच दोन गार्डिअनचे संपर्क क्रमांक दिले जाणार आहेत. एका क्लिकवर काही सेकंदात या पाचही जणांना ‘आय अ‍ॅम इन डेंजर, प्लीज फॉलो माय ट्रॅक’ असा संदेश जाईल.

Web Title: Ganesha decorations by women who have been attacked by acid attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.