Join us
Daily Top 2Weekly Top 5

गली गली मे शोर है...  अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचं आक्रमक आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 14:27 IST

दरम्यान अर्णव गोस्वामी याला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा अशी मागणी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली

ठळक मुद्देदरम्यान अर्णव गोस्वामी याला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा अशी मागणी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली

मुंबई - गली गली मे शोर है अर्णब गोस्वामी चोर है... अटक करा अटक करा अर्णब गोस्वामीला अटक करा... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णब गोस्वामीच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढणार्‍या अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही गोस्वामी यांस अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्‍या व्यक्तीचे नांव जाहीर करावे, यासाठी त्यांच्या रिपब्लिक टिव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. 

दरम्यान अर्णब गोस्वामींना गोपनीय माहिती मिळाली आणि त्यांनी चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्यांस तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा अशी मागणी माजी आमदार विद्या चव्हाण यांनी केली. तर राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी अर्णब गोस्वामी यांस ही गोपनीय माहिती कुणी पुरवली याची माहिती उघड करावी अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली. यावेळी माजी आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते महेश तपासे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसअर्णब गोस्वामीपोलिसगृह मंत्रालय