Join us
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, पट्ट्याने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 10:16 IST

इन्स्टाग्रामव्ररून ओळख झालेल्या तरुणाला भेटणे अल्पवयीन मुलीला भलतेच महागात पडले आहे.

मुंबई :

इन्स्टाग्रामव्ररून ओळख झालेल्या तरुणाला भेटणे अल्पवयीन मुलीला भलतेच महागात पडले आहे. या तरुणाने १७ ऑक्टोबरला दुपारी साडे तीनच्या सुमारास तिला आपल्या घरी भेटायला बोलावले. येथे आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला विरोध केला. मात्र आरोपीने तिला कंबरपट्ट्याने मारहाण करत तिच्यासोबत असलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.

पीडित मुलगी दादरमध्ये कुटुंबासोबत राहते. यातील १९ वर्षीय आरोपीसोबत तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाल्यानंतर आरोपीने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

 

टॅग्स :इन्स्टाग्रामगुन्हेगारी