मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 06:24 IST2025-08-27T06:22:00+5:302025-08-27T06:24:38+5:30

Metro 4: मुंबई मेट्रो लाइन ४साठी ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) ही सिग्नल प्रणाली फ्रान्समधील अलस्टाॅम ही कंपनी पुरवणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. ही कंपनी पुरवठा केलेल्या वस्तूंसाठी पाच वर्षे देखभाल सेवाही देणार आहे.

French company to build 39 driverless trainsets for Metro 4 | मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट

मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट

नवी दिल्ली - मुंबईमेट्रो लाइन ४साठी ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) ही सिग्नल प्रणाली फ्रान्समधील अलस्टाॅम ही कंपनी पुरवणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. ही कंपनी पुरवठा केलेल्या वस्तूंसाठी पाच वर्षे देखभाल सेवाही देणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत मुंबईमेट्रो रिजनल डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने (एमएमआरडीए) लार्सन अँड टुब्रोसोबत मुंबई मेट्रो लाइन ४साठी (ग्रीन लाइन) इंटिग्रेटेड सिस्टम्स पॅकेजचा करार केला आहे. लार्सन अँड टुब्रोने अलस्टॉमला रोलिंग स्टॉक (रेल्वे डबे) आणि सिग्नल प्रणाली निर्मितीसाठी भागीदार म्हणून नियुक्त केले आहे. अलस्टॉमच्या निवेदनानुसार, ही कंपनी भारतात ३९ मेट्रो ट्रेनसेट्स (प्रत्येकी ६ डब्यांचे) तयार करणार असून, त्यासोबत सीबीटीसी सिग्नलिंग प्रणाली आणि पाच वर्षांची देखभाल सेवा देणार आहे.

या ट्रेनसेटची वैशिष्ट्ये
हे सर्व ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेनसेट असतील
संपूर्ण उत्पादन अलस्टॉमच्या भारतातील कारखान्यांत होईल
त्या मेट्रो ट्रेनचे डिझाईन बंगळुरू येथील इंजिनीअरिंग केंद्रात तयार होईल
ट्रेनची निर्मिती आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे तर प्रोपल्शन सिस्टिम तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे होईल
ट्रेनचे बोगी उत्पादन गुजरातमध्ये होईल

३५.३ किमीचा मुंबई मेट्रो लाइन ४ मार्ग
अलस्टॉमच्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई मेट्रो लाइन ४साठी ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेटमध्ये प्रवाशांसाठी आरामदायक सुविधा, इलेक्ट्रिकल ब्रेकिंग सिस्टम आणि सायबर सिक्युरिटी उपाययोजना यांचा समावेश असेल. सीबीटीसी तंत्रज्ञानामुळे हे ट्रेनसेट्स ड्रायव्हरशिवाय चालवता येतील आणि ३५.३ किमी लांब असलेल्या मुंबई मेट्रो लाइन ४ मार्गावर सेवा पुरवता येईल. वडाळापासून सुरू होणारा हा मार्ग ठाण्याच्या कासारवडवलीपर्यंत जातो. त्या मार्गात एकूण ३२ स्थानके असतील.

Web Title: French company to build 39 driverless trainsets for Metro 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.