Free treatment of coronavirus artery by Mahatma Phule Public Health Scheme | कोरोनाबाधितांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार

कोरोनाबाधितांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता कोरोना आजाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यभरात १ एप्रिलपासून या योजनेंतर्गत सुमारे १००० रुग्णालयांचा समावेश होणार असल्याने त्यामध्ये कोरोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकतील. या महत्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे दोन हजार व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना अनेक दीर्घ व उपचाराचा खर्च न परवडणा? आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. सध्या या योजनेत राज्यभरातील ४९२ खासगी रुग्णालये सहभागी असून येत्या १ एप्रिलपासून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन १००० रुग्णालयांचा समावेश होईल.

योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांच्या सहभागाची संख्या वाढणार असल्याने कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास किमान २००० व्हेंटीलेटर्स उपलब्ध होवू शकतात त्याचबरोबर सुमारे एक लाख खाटाही यामाध्यमातुन उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी संगितले.कोरोनाबाबत शुक्रवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री टोपे यांनी या महत्वपूर्ण निणयार्बाबत दोघांशी चर्चा केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Free treatment of coronavirus artery by Mahatma Phule Public Health Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.