Join us

पूरग्रस्त भागातील निराधारांना आधार, मोफत धान्य वाटप होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 09:47 IST

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरे दोन-दोन दिवस पाण्याखाली होती.

ठळक मुद्देसोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरे दोन-दोन दिवस पाण्याखाली होती.

मुंबई - महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातील अनेक भागांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार  शरद पवार हे भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे, अशा निराधार कुटुंबाना मोफत अन्नधान्य पुरवठा करणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण  मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरे दोन-दोन दिवस पाण्याखाली होती. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून शासनाकडून प्रतिकुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या ०८ मार्च २०१९ च्या (सीएलएस-२०१८/प्र.क्र.२२५/म-३) शासन निर्णयानुसार ही मदत देणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :छगन भुजबळशेतकरीपूर