प्रवेशाच्या नावाखाली गोल्फ प्रशिक्षकाला चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:40 IST2025-03-19T14:40:19+5:302025-03-19T14:40:58+5:30

चेंबूरमधील वाडवली गावात राहणारे ५१ वर्षीय तक्रारदार हे एका नामांकित गोल्फ क्लबमध्ये प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वत:च्या मुलाला सोमय्या काॅलेजमध्ये ११ वीला प्रवेश मिळवून देण्यासाठी एका दुकानदार मित्राला ओळख काढण्यास सांगितले. 

Fraud with Golf instructor in the name of admission | प्रवेशाच्या नावाखाली गोल्फ प्रशिक्षकाला चुना

प्रवेशाच्या नावाखाली गोल्फ प्रशिक्षकाला चुना

मुंबई : सोमय्या कॉलेजमध्ये बनावट दस्तऐवजांच्या आधारे अकरावी प्रवेशाचे प्रकरण ताजे असतानाच, या काॅलेजमध्ये मुलाला प्रवेश देण्याच्या नावाखाली तिघांनी चेंबूरमधील गोल्फ प्रशिक्षकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी  गुन्हा नोंदवत चेंबूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

चेंबूरमधील वाडवली गावात राहणारे ५१ वर्षीय तक्रारदार हे एका नामांकित गोल्फ क्लबमध्ये प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वत:च्या मुलाला सोमय्या काॅलेजमध्ये ११ वीला प्रवेश मिळवून देण्यासाठी एका दुकानदार मित्राला ओळख काढण्यास सांगितले. 

संदीप मोरे हा शैक्षणिक प्रवेशाची कामे करत असल्याचे या मित्राने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोघांची भेट घालून दिली. त्यानंतर मोरे याने मुलाच्या सोमय्या काॅलेजमध्ये प्रवेशासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने सुरुवातीला ७० हजार रुपयांसह मुलाची कागदपत्रेही दिली. उरलेले ३० हजार रुपये मुलाला प्रवेश मिळाल्यावर देण्याचे ठरले. मात्र महिना उलटूनही मुलाला काॅलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही.   

... ‘ते’ आश्वासनही फोल
तक्रारदाराने मोरेला विचारणा करताच, सोमय्या काॅलेजमध्ये प्रवेश आता मिळत नसल्याचे स्पष्ट करत अन्य काॅलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे मोरेने सांगितले. 

विश्वास संपादन करण्यासाठी ‘सोमय्या कॉलेजमधील कर्मचारी ताहीर ते तुम्हाला काॅल करतील,’ असे मोरेने त्यांना सांगितले. ताहीर नावाच्या व्यक्तीने कॉल करून दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणार असल्याचे सांगितले. 

त्यानंतरही प्रवेश न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.  पोलिसांनी मोरे याच्यासह ताहिर आणि साळवी नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. 

Web Title: Fraud with Golf instructor in the name of admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.