लोणावळा, कर्जत व्हिला बुकिंगच्या नावे फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:15 IST2025-03-22T14:14:50+5:302025-03-22T14:15:43+5:30

आरोपीने सोशल मीडिया आणि फसव्या वेबसाइट्सद्वारे लक्झरी निवासस्थानांसाठी आकर्षक डीलची जाहिरात करून पीडितांना आमिष दाखवले...

Fraud in the name of booking villas in Lonavala, Karjat | लोणावळा, कर्जत व्हिला बुकिंगच्या नावे फसवणूक

लोणावळा, कर्जत व्हिला बुकिंगच्या नावे फसवणूक

मुंबई : लोणावळा, तसेच कर्जतमध्ये व्हिला, रिसॉर्ट्स आणि हॉटेल्ससाठी ऑनलाइन बुकिंगचे आमिष दाखवून लोकांना फसविण्याच्या आरोपाखाली ओशिवरा पोलिसांनी तरुणाला अटक केली. आकाश जाधवानी (२५) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर मलबार हिल, एलटी मार्ग, विलेपार्ले पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

आरोपीने सोशल मीडिया आणि फसव्या वेबसाइट्सद्वारे लक्झरी निवासस्थानांसाठी आकर्षक डीलची जाहिरात करून पीडितांना आमिष दाखवले. एकदा पीडितांनी आगाऊ पैसे भरले की, तो बुकिंग न देता गायब व्हायचा, असे तपासात उघड झाले आहे. जानेवारीमध्ये एका ४० वर्षीय रिअल इस्टेट ब्रोकरने ४२ हजार रुपये गमावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कर्जत, खोपोली, लोणावळा येथे कुटुंब, मित्रांसह सुट्टी घालवण्याची योजना आखत असलेल्या तक्रारदाराला इंस्टाग्रामवर एक जाहिरात दिसली. त्याने लिंकवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲप संपर्क क्रमांक मिळवत एजंटशी संभाषण सुरू केले. आरोपीने १६ ते १८ मार्चदरम्यान लोणावळा येथे  मुक्कामासाठी १८ सदस्यांच्या गटासाठी ८५ हजारांचे पॅकेज देऊ केले. त्याने ४२,००० रुपयांची आगाऊ रक्कम मागितली, जी तक्रारदाराने त्याच्या बँक खात्यातून ट्रान्सफर केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पीजीच्या पत्त्याचा गैरवापर
ट्रॅव्हल ग्रुपमधील सदस्यांनी तक्रारदाराला ट्रॅव्हल कंपनीच्या खराब प्रतिष्ठेबद्दल सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने, त्याने बुकिंग रद्द करण्यासाठी एजंटशी संपर्क साधत परतफेड करण्याची विनंती केली. एजंटशी संपर्क न झाल्याने तक्रारदाराने ओशिवरा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. 

जाधवानी हा पेइंग गेस्टमध्ये राहायचा. त्या पत्त्याचा वापर बँक खाती उघडण्यासाठी करायचा. अखेर वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील आणि पोलिस निरीक्षक प्रभात मानकर यांच्या देखरेखीखाली, उपनिरीक्षक शरद देवडे आणि हेड कॉन्स्टेबल अशोक कोंडे या सायबर पथकाने त्याला अटक केली.

Web Title: Fraud in the name of booking villas in Lonavala, Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.