चौथा बळी; पीएमसी बँक खातेदाराच्या वैद्यकीय उपचारासाठी पैसे न मिळाल्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 18:08 IST2019-10-18T18:05:23+5:302019-10-18T18:08:38+5:30
गेल्या आठवड्याभरात पीएमसी बँक खातेदाऱ्यांपैकी चौथ्या खातेदाराचा मृत्यू झाला आहे.

चौथा बळी; पीएमसी बँक खातेदाराच्या वैद्यकीय उपचारासाठी पैसे न मिळाल्याने मृत्यू
मुंबई - पीएमसी बॅंकेच्या आणखी एक खातेदाराचा वैद्यकीय उपचारासाठी पैसे न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलुंड येथे राहणारे मुरलीधर धर्रा यांचा आज मृत्यू झाला. पीएमसी बँकेत त्यांचे खाते असून ते आजारी होते असून त्यांचा मुलगा प्रेम याला उपचारासाठी बँकेतून पैसे मिळाले नाही, म्हणून मुरलीधर यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गेल्या आठवड्याभरात पीएमसी बँक खातेदाऱ्यांपैकी चौथ्या खातेदाराचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपूर्वी पीएमसी बँकेत लाखो रूपये अडकून राहिल्याचा मानसिक तणावातून ह्रदयविकाराच्या झटक्यानं संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) यांना जीव गमवावा लागला आहे. या घटना ताज्या असताना तणावामुळे आता पीएमसी बँकेत १ कोटींची रक्कम असलेल्या डॉ. योगिता बिजलानी यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या डॉ. बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.