मालाड येथील मढ जेट्टी समुद्रात बुडाली बोट, चार जणांना वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 17:30 IST2020-04-15T17:27:27+5:302020-04-15T17:30:10+5:30
बुडालेल्या बोटीत एकूण ७ जण होते.

मालाड येथील मढ जेट्टी समुद्रात बुडाली बोट, चार जणांना वाचविण्यात यश
ठळक मुद्देसायंकाळी ४. ३० वाजताच्या सुमारास चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर अग्निशमन दलाच्या पथकाने हरवलेल्या तिघांच्या शोधकामी तपास स्थानिक पोलिसांकडे दिला आहे. ही घटना आज १.३० वाजताच्या सुमारास घडली. मुंबई अग्निशमन दलास याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांच्या पथकासह अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले
मुंबई - मालाड पश्चिमेकडील मढ जेट्टी येथे एक बोट बुडाली आहे. ही घटना आज १.३० वाजताच्या सुमारास घडली. मुंबई अग्निशमन दलास याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांच्या पथकासह अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आणि बुडालेल्या चौघांना वाचविण्यात त्यांना यश आले.
बुडालेल्या बोटीत एकूण ७ जण होते. त्यापैकी चौघांना सुखरूप वाचविण्यास बचाव पथकास यश आले. तर उर्वरित तिघांचा पत्ता अजून लागलेला नाही. सायंकाळी ४. ३० वाजताच्या सुमारास चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर अग्निशमन दलाच्या पथकाने हरवलेल्या तिघांच्या शोधकामी तपास स्थानिक पोलिसांकडे दिला आहे.