ठाकरेंना आणखी एक धक्का; वरळीमधील माजी नगरसेविका रत्ना महालेंचा शिंदे गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:30 IST2024-01-05T15:24:08+5:302024-01-05T15:30:01+5:30
रत्ना महाले यांच्या या प्रवेशामुळे आदित्य ठाकरेंना धक्का असल्याचं मानलं जात आहे.

ठाकरेंना आणखी एक धक्का; वरळीमधील माजी नगरसेविका रत्ना महालेंचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रत्ना महाले यांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. रत्ना महाले यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी माजी नगरसेवक दत्ता नरवणकर देखील उपस्थित होते. रत्ना महाले यांच्या या प्रवेशामुळे आदित्य ठाकरेंना धक्का असल्याचं मानलं जात आहे.
मुंबईतील वरळी विभागातील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका रत्नाताई महाले यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. #Shivsena#Mumbai#Palghar#EknathShinde@Shivsenaofcpic.twitter.com/s31RI45YMh
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी अजून ८ महिने मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले. आपल्याला खूप कामे करायची असून बरेच फिरायचे आहे, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले. सरकार काम करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते प्रवेश करत आहे. 'शासन आपल्या दारी कार्यक्रम' सर्वात लोकप्रिय आहे. राज्यातील २ कोटी लोकांनी लाभ घेतल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
पालघरमधील विविध पक्षांचे सरपंच शिंदे गटात
शिवसेनेचे आदिवासी समाज महाराष्ट्र संघटक जगदीश धोडी यांच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यातील विविध पक्षांचे सरपंच आणि तसेच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी या भागात उद्योग आणण्याचा निश्चितच प्रयत्न करू असे एकनाथ शिंदेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.