Dhananjay Jadhav: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 08:53 AM2021-03-30T08:53:58+5:302021-03-30T08:54:42+5:30

१९७३ च्या बॅचमधील धनंजय जाधव(Dhananjay Jadhav) हे आयपीएस अधिकारी होते, १९९२ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पोलीस पदक प्रदान करून गौरव करण्यात आला होता

Former Mumbai Police Commissioner Dhananjay Jadhav dies at hospital | Dhananjay Jadhav: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये निधन

Dhananjay Jadhav: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये निधन

googlenewsNext

मुंबई  - माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ७४ वर्षाचे होते, मागील काही दिवसांपासून धनंजय जाधव यांना ह्दयासंबंधित आजाराचा त्रास होता, धनंजय जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी साताऱ्यातील पुसेगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.( Former Mumbai Commissioner Of Police Dhananjay Jadhav Passes Away)  

१९७३ च्या बॅचमधील धनंजय जाधव(Dhananjay Jadhav) हे आयपीएस अधिकारी होते, १९९२ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पोलीस पदक प्रदान करून गौरव करण्यात आला होता, अनेक पुरस्कारांनी धनंजय जाधव यांना गौरविण्यात आलं होतं, २००७ मध्ये धनंजय जाधव यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली होती, त्यानंतर २००२ मध्ये जाधव यांना पदोन्नती देत अप्पर पोलीस महासंचालक म्हणून महामार्ग सुरक्षा पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी दिली होती.

धनंजय जाधव यांचा जन्म १९४७ साली झाला, साताऱ्यातील पुसेगावमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते वाई येथे आले, MSC पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ते रायगड येथे शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. याचवेळी UPSC परीक्षा देत त्यांना १९७२ मध्ये यश आलं, IPS म्हणून धुळे येथे त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर वर्धा, पुणे महामार्ग, अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून धनंजय जाधव कार्यरत होते.

धनंजय जाधव यांनी २००४ ते २००७ या कालावधीत पुण्याचे पोलीस आयुक्त(Pune Police Commissioner) म्हणून काम केले, त्यानंतर २००७ ते २००८ पर्यंत धनंजय जाधव हे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून होते, याचपदावर ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर २ वर्ष MPSC बोर्डावर त्यांनी काम केले. धनंजय जाधव यांनी सामाजिक कार्यासोबत निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी काम केले. पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी त्यांना पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर दिली परंतु शेवटपर्यंत धनंजय जाधव हे राजकारणापासून दूर राहिले होते.    

Read in English

Web Title: Former Mumbai Police Commissioner Dhananjay Jadhav dies at hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस