Join us

'...तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे'; आदित्य ठाकरे यांचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 14:11 IST

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतुन राजीनामा द्यावा आणि पुन्हा लढवुन यावं, असं आव्हान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं होतं. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करत असतील तर मी आता माझा राजीनामा द्यायला तयार आहे, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं आहे. 

सुधीर मुनगंटीवार यांचं या सरकारमध्ये कोणी ही ऐकत नाही. मुख्यमंत्र्यांना कारभार जमत नाही आहे. सगळीकडे गोंधळ सुरु आहे. स्वत:चं पद कसं वाचवुन ठेवायचं हे एवढेच मुख्यमंत्र्यांना माहित आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. तसेच या गद्दार सरकारच्या विरोधात सगळेच राजकीय पक्ष एकत्रित आले आहोत. जर कर्नाटकात ४० टक्के भ्रष्टाचारी सरकार असेल तर महाराष्ट्रात १०० टक्के भ्रष्टाचारी सरकार आहे. संपुर्ण राज्यात चिखल तयार केल्यानंतर आता नालेसफाई करणं काय गरजेच आहे, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेआदित्य ठाकरेमहाराष्ट्र सरकार