'माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटलांना JDS कडून उमेदवारी, काँग्रेसही देणार पाठिंबा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 20:33 IST2019-03-13T20:33:23+5:302019-03-13T20:33:46+5:30
औरंगाबादमधील लोकसभा निवडणुकीत गेल्या 5 टर्ममध्ये काँग्रेस एकदाही निवडूण येऊ शकली नाही.

'माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटलांना JDS कडून उमेदवारी, काँग्रेसही देणार पाठिंबा'
मुंबई : औरंगाबादलोकसभा मतदारसंघातून माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील हे जनता दल सचे उमेदवार असणार आहेत. विशेष म्हणजे, जनता दलाचे उमेदवार कोसळे पाटील यांना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडूनही पाठिंबा मिळेल, असे जनता दल धर्मनिरपेक्षचे नेते प्रताप होगडे यांनी सांगितले आहे.
औरंगाबादमधीललोकसभा निवडणुकीत गेल्या 5 टर्ममध्ये काँग्रेस एकदाही निवडूण येऊ शकली नाही. त्यामुळे काँग्रेसने औरंगाबादची जागा जनता दलसाठी सोडावी, म्हणून काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. आमचे नेते मल्लीकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधी यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. काँग्रेसचा पाठिंबा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे, असे प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे बीजी कोळसे पाटील हे औरंगाबाद येथून जनता दलाचे उमेदवार असतील असे मानायला हरकत नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने कोळसे पाटील यांना औरंगाबाद येथून लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं होतं.
2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी एक लाख 62 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील यांना पराभूत केले. खैरे यांना 5 लाख 20 हजार 902 तर नितीन पाटील यांना 3 लाख 58 हजार 902 मते मिळाली होती. बहुजन समाज पार्टीला 37 हजार 419 मतांवर समाधान मानावे लागले होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेकडे दोन, भाजपाकडे दोन,राष्ट्रवादीकडे एक आणि एमआयएम एक अशी स्थिती आहे. त्यामुळे यावेळी तिकीट मिळाल्यास खैरेंविरुद्धच्या अँटीइन्कमबन्सीचा आणि वंचित बहुजन आघाडीचा फायदा कोळसे पाटील यांना मिळू शकतो.