Join us

"देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल..."; सचिन वाझेंच्या आरोपावर अनिल देशमुखांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 11:10 IST

Anil Deshmukh On Sachin Waze : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

Anil Deshmukh On Sachin Waze ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज मुंबई पोलिसातील निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घ्यायचे असा आरोप वाझे यांनी केला आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या आरोपाला आता अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. 

"अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, फडणवीसांना मी एक..."; सचिन वाझेच्या आरोपांनी खळबळ

सचिन वाझे यांच्या आरोपांवर बोलताता अनिल देशमुख म्हणाले, 'मी चार दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते, तीन वर्षापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशापद्धतीने अॅफिडेव्हीट मी करुन द्यावं हा प्रस्ताव आला होता, याची वस्तुस्थिती मी जनसेसमोर आणली होती. त्यानंतर आता फडणवीस यांची ही नवीन चाल आहे, असा आरोपही अनिल देशमुख यांनी फडणवी यांच्यावर केला. 'देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहित नाही, मुंबई हायकोर्टाने हे सांगितलं आहे की, सचिन वाझे गुन्हेगारीतील आहे. त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. त्याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवण्यालायक नाही, असं हायकोर्टाने म्हटले आहे. अशा व्यक्तीच्या माध्यमातून फडणवीस यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, असंही देशमुख म्हणाले.  

सचिन वाझेच्या माध्यमातून माझ्यावर आरोप केले जात आहेत. त्याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटले आहे, असंही माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. 

सचिन वाझेच्या आरोपांनी खळबळ

मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेने पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला. सचिन वाझेनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे असल्याची माहिती सचिन वाझेने दिली आहेत. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप वाझेने केला. 

अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या अनिल देशमुखांना सचिन वाझेने अडचणीत आलं आहे. सचिन वाझेनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सचिन वाझेला रुग्णालयात नेत असताना त्याने ‘एएनआय’ला दिलेल्या प्रतिक्रियेत देशमुखांवर गंभीर आरोप केले. 

टॅग्स :अनिल देशमुखसचिन वाझेदेवेंद्र फडणवीस