माजी फुटबाॅलपटुचा जंगलात आढळला गळफास घेतलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:39 IST2025-11-25T09:38:54+5:302025-11-25T09:39:34+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या मेंढवन खिंडीतील जंगल परिसरात मुंबईतील माजी फुटबॉलपटू सागर सोरटी याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी कासा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सागर सोरटी (३५, रा. मरीन लाईन्स, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे.

माजी फुटबाॅलपटुचा जंगलात आढळला गळफास घेतलेला मृतदेह
कासा - मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या मेंढवन खिंडीतील जंगल परिसरात मुंबईतील माजी फुटबॉलपटू सागर सोरटी याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी कासा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सागर सोरटी (३५, रा. मरीन लाईन्स, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर सोरटी काही दिवसांपूर्वी पुणे येथे फुटबॉल खेळण्यास जात असल्याचे सांगून आपल्या घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर त्याचा कुटुंबीयांशी संपर्क झाला नाही. त्यानंतर १७ नोव्हेंबरला मेंढवन खिंडीतील जंगलात त्याचा मृतदेह आढळला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर गेल्या वर्षभरापासून मानसिक तणावाखाली होता. त्याचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली.