वाहतूक पोलिसांवर कारवाईची सक्ती; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 01:58 AM2020-06-17T01:58:04+5:302020-06-17T01:58:12+5:30

५० कारवाया केल्या तरच मशीन जमा करा

Forcing action on traffic police | वाहतूक पोलिसांवर कारवाईची सक्ती; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश

वाहतूक पोलिसांवर कारवाईची सक्ती; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश

Next

मुंबई : दररोज वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ५० वाहनांवर कारवाई करा अन्यथा कारवाईची मशीन आणि वॉकीटॉकी जमा करणार नाही असे वाहतूक पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतुकीला बंदी होती. जून महिन्यापासून वाहतूक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. तसेच दुकाने, कार्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक रस्त्यावर येत आहेत. पण वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. हेल्मेट न घालणे, वेगात वाहन चालविणे, सिग्नल ओलांडणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्या वाहनांवर ई-चलन आकारले जाते, तर मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीला परवानगी नाही रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेरच्या गाड्या दिवसभरासाठी जप्त करण्यात येत आहेत.

वाहतूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, वाहतूक पोलिसांना दररोज वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २५ ते ५० वाहनांना ई-चलन आकारण्यास सांगितले आहे. यासोबतच ५ ते १0 रिक्षा-टॅक्सी जमा करून त्या दिवसभरासाठी ताब्यात घेण्यास सांगितले आहे. दरम्यान रिक्षा-टॅक्सी जमा केल्या जातात. एका मिनिटात येणाºया पाच ते सहा रिक्षा ठेवायच्या कुठे, असा सवाल वाहतूक पोलीस विचारत आहेत.
एका वाहतूक पोलिसाने सांगितले आहे की, रिक्षा-टॅक्सीबाबत सरकारने रिक्षा-टॅक्सी संघटनांशी चर्चा करून बंद ठेवण्याचे स्पष्ट करायला हवे. तसेच जाहीर करायला हवे.

Web Title: Forcing action on traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.