वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फ्लोटिंग क्रूझ बुडाले, 15 जणांना वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 21:14 IST2018-05-25T20:39:52+5:302018-05-25T21:14:13+5:30

वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फ्लोटिंग क्रूझ बुडाले, 15 जणांना वाचवण्यात यश
वांद्रे वरळी सी लिंकवरील टोलनाक्याजवळ शुक्रवारी एका फ्टोटिंग क्रूझला जलसमाधी मिळाली. यावेळी बोटीवर असलेल्या 15 जणांना वाचवण्यात यश आले. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट नुकतेच सुरू करण्यात आले होते. आज दुपारच्या सुमारास या रेस्टॉरंटमध्ये समुद्राच्या लाटांचे पाणी शिरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.