वडाळा येथील आगीत दोन चिमुकल्यांसह पाचजण जखमी, मांजराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 20:41 IST2019-10-09T20:39:22+5:302019-10-09T20:41:26+5:30
घटना आज दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास घडली.

वडाळा येथील आगीत दोन चिमुकल्यांसह पाचजण जखमी, मांजराचा मृत्यू
मुंबई - वडाळा येथील गणेश नगर, निर्मल विद्यालयाजवळ बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टाटा पॉवर कंपनीच्या मुख्य उच्च वीज वाहिनीची ओव्हर हेड वायर घराच्या छताला लागून स्फोट झाल्याची घटना आज दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास घडली. या स्फोटामुळे येथील खोली क्रमांक ३५३ या घरास लागलेल्या आगीत पाचजण जखमी झाले तर एका मांजरीचा मृत्यू झाला.
जखमींमध्ये २ महिला, ३ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. पाचही जखमींवर सायन आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, जयश्री खारगावकर, जागृती चिकाटे (३६), दीप्ती खारगावकर, खुशी चिकाटे, स्वरा चिकाटे(२), अंश खारगावकर(दीड वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी टाटा पॉवरनेही घटनास्थळी धाव घेतली होती. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी टाटा पॉवर वेळोवेळी जनजागृती अभियान राबवत आहे.
मुंबई - वडाळा येथील झोपडपट्टीवर उच्च दाबाची विद्युत वाहिनी पडल्याने तिघेजण जखमी https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 9, 2019