मुंबईतील वांद्रे परिसरात इमारत कोसळून पाच जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 23:12 IST2020-08-17T23:08:45+5:302020-08-17T23:12:08+5:30

वांद्रे परिसरामध्ये एक रिकामी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

Five injured in building collapse in Mumbai's Bandra area | मुंबईतील वांद्रे परिसरात इमारत कोसळून पाच जण जखमी

मुंबईतील वांद्रे परिसरात इमारत कोसळून पाच जण जखमी

मुंबई - वांद्रे परिसरामध्ये एक रिकामी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.  वांद्रे आर्किटेक्चर कॉलेज, शेअरली राजन रोड, बांद्रा पश्चिम येथे ही दुर्घटना घडली. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.  दरम्यान, ढिगाऱ्याखालून आतापर्यंत सात लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत रिकामी होती. मात्र ही इमारत बाजूच्या दुकानांवर कोसळल्याने त्याखाली काही लोक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Web Title: Five injured in building collapse in Mumbai's Bandra area