गणेशोत्सवात शाळांना पाच दिवस सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 03:50 IST2019-08-09T03:49:55+5:302019-08-09T03:50:57+5:30

लेखी किंवा तोंडी परीक्षा न घेण्याचे निर्देश

Five days holiday to school in Ganeshotsav | गणेशोत्सवात शाळांना पाच दिवस सुट्टी

गणेशोत्सवात शाळांना पाच दिवस सुट्टी

मुंबई : गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी जाहीर करावी आणि या काळात विद्यार्थ्यांच्या कोणत्याही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असे निर्देश शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई उपसंचालकांना दिले आहेत.

गणेशोत्सवासाठी सुट्टीची मागणी करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांकडे बैठकीस गेलेल्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे गणेशोत्सव काळात सुट्टीसाठी गावी जाणाºया विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळेल. शिवाय गणेशोत्सव काळात परीक्षा घेणाºया इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही चाप बसेल, अशी प्रतिक्रिया युवासेना मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. मुळात उत्सवकाळात परीक्षा घ्यायच्याच नाहीत, अशा सूचना असतानाही शासन आदेश धुडकावला जातो. त्यामुळे अशा शाळांविरोधात शिक्षण विभागाने कडक कारवाई केली करावी अशी मागणी युवासेनेने शिक्षणमंत्र्यांकडे केल्याचीही माहिती सावंत यांनी दिली.

Web Title: Five days holiday to school in Ganeshotsav