पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्टला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 07:17 PM2020-08-04T19:17:12+5:302020-08-04T19:17:48+5:30

मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नोंदणी करण्याची मुदत विद्यापीठाने एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे.

The first merit list for degree admission is on 6th August | पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्टला 

पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्टला 

googlenewsNext

मुंबई : मुंबईविद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नोंदणी करण्याची मुदत विद्यापीठाने एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी २४ जुलै पासून सुरू झाली आहे. पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पहिली मेरीट लिस्ट ४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार होती. मात्र मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यानी विनंती केल्याने ही गुणवत्ता यादी पुढे ढकलली असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. 

प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी अधिक सूलभ व्हावी, विद्यार्थ्यांच्या संभाव्य अडचणी, शंकांचे समाधान करण्यासाठी विद्यापीठाने तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. गुगल फॉर्मच्या मदतीने विद्यार्थी त्यांचे प्रश्न, शंका उपस्थित करू शकतात. यामध्ये लॉगिनसंबंधीच्या शंका, अभ्यासक्रम, कागदपत्रे अपलोड करणे, महाविद्यालयांची निवड अशा अनुषंगिक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्याना त्यांच्या ईमेल आयडी वर मिळू शकतील अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.  ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रीया अधिक सूलभ होण्यासाठी विद्यापीठाने याआधी चॅटबोट, व्हिडिओ ट्यूटोरिअल आणि हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सुधारित प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक: 
अर्ज विक्री - २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०
प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) - २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत)
प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे - २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी - ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क - ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
दुसरी गुणवत्ता यादी - ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क - १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
तिसरी गुणवत्ता यादी - १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क - १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)

 

Web Title: The first merit list for degree admission is on 6th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.