आधी महिलेशी लगट, नंतर लैंगिक सुखाची मागणी; ब्लॅकमेल करणाऱ्या जीम ट्रेनरला बेड्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2023 12:46 IST2023-07-31T12:45:26+5:302023-07-31T12:46:06+5:30

याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी विनयभंगासह खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर जीम ट्रेनरला पोलिसांनी अटक केली आहे.

First attachment to woman, then demand for sexual pleasure Shackles to blackmailing gym trainer | आधी महिलेशी लगट, नंतर लैंगिक सुखाची मागणी; ब्लॅकमेल करणाऱ्या जीम ट्रेनरला बेड्या 

आधी महिलेशी लगट, नंतर लैंगिक सुखाची मागणी; ब्लॅकमेल करणाऱ्या जीम ट्रेनरला बेड्या 

मुंबई : एका खासगी क्लासेस घेणाऱ्या महिलेला जीम ट्रेनरने ब्लॅकमेल करत आधी ७१ हजार रुपये उकळले. त्यानंतर लगट करत तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याची घटना ताडदेव मध्ये समोर आली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी विनयभंगासह खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर जीम ट्रेनरला पोलिसांनी अटक केली आहे.

गिरगाव मध्ये ४० वर्षीय पीडित महिला या खासगी क्लासेस चालवतात. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गोवंडी येथे राहणार गुलाम रजा मोहम्मद उमर कुरेशी (३८) या जीम ट्रेनरला अटक केली आहे. कुरेशी याने महिलेशी आधी मैत्री केली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला गेला. 

याचदरम्यान, व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉलद्वारे झालेले संभाषण सुरू केले. हे संभाषण कुरेशी याने व्हायरल करण्याची धमकी देत पैसे मागण्यास सुरुवात केली. महिलेने भीतीपोटी ७१ हजार रुपये त्याला दिले. त्यानंतर, कुरेशीने तिच्याकडे लैंगिक संबंधाची मागणी केली. महिलेने नकार देताच पुन्हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. १० जूनपासून कुरेशी हा पीडित महिलेला ब्लॅकमेलिंग करीत होता. ताडदेव पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत त्याला ताब्यात घेतले. पोलिस अधिक तपास करीत आहे.

Web Title: First attachment to woman, then demand for sexual pleasure Shackles to blackmailing gym trainer