Join us

मुंबई-जयपूर सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये गोळीबार, मरण पावलेला एक प्रवासी नालासोपाऱ्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 11:59 IST

अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपूरवाला (६२) असे त्यांचे नाव आहे. 

नालासोपारा : मुंबई-जयपूर सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात मरण पावलेल्या प्रवाशांपैकी एक नालासोपारा शहरातील आहे. अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपूरवाला (६२) असे त्यांचे नाव आहे. 

नालासोपाऱ्याच्या आचोळे रोडवरील ‘तेज प्रतिभा’ सोसायटीतील ‘ए’ विंगच्या ४०२ नंबरच्या फ्लॅटमध्ये ते राहत होते. बोहरी समाजातील असल्यामुळे मोहरमनिमित्त मूळगावी भानपूरला ते गेले होते. त्यांना हुसेन हा मुलगा आणि जैनत ही मुलगी आहे. हुसेन दुबईत कामानिमित्त असून, त्यांची पत्नीही सध्या मुलांसोबत दुबईला आहे. मुलगी जैनत हिचे लग्न झाले असून, ती अहमदाबादला राहते. 

हुसेन हा दुबईवरून निघाल्याचे रहिवाशांनी सांगितले. अब्दुल यांचे गालानगर येथे डायपर विक्रीचे दुकान आहे. पुढच्या आठवड्यात ते दुबईला पत्नी व मुलांकडे जाणार होते. ते त्यांच्या सोसायटीचे सचिव म्हणून काम पाहत होते. 

टॅग्स :रेल्वेगोळीबारप्रवासीपोलिस