हा केवळ ट्रेलर आहे आणि ऐकले नाही तर, गोळ्या छातीत घातल्या जातील; बॉलिवूडला धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 10:18 IST2026-02-02T10:17:44+5:302026-02-02T10:18:55+5:30

Firing at Rohit Shetty Residence: बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर शनिवारी रात्री अज्ञात गुंडांनी गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे, या हल्ल्याची जबाबदारी सोशल मीडियाद्वारे लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.

Firing at Rohit Shetty Residence: Bishnoi Gang Claims Responsibility, Issues Chilling Warning to Bollywood | हा केवळ ट्रेलर आहे आणि ऐकले नाही तर, गोळ्या छातीत घातल्या जातील; बॉलिवूडला धमकी!

हा केवळ ट्रेलर आहे आणि ऐकले नाही तर, गोळ्या छातीत घातल्या जातील; बॉलिवूडला धमकी!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: शुभम लोणकर आरा बिश्नोई या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून 'शुभम लोणकर, आरा बिश्नोई, हरी बॉक्सर आणि हरमन शांडू-याच्या नावाने रोहित शेट्टी यांच्या घरावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली. पोस्टमध्ये कामात हस्तक्षेप करू नका, असे अनेकदा सांगितले; पण ऐकले नाही.' हा केवळ ट्रेलर आहे आणि ऐकले नाही तर गोळ्या 'छातीत घातल्या जातील' म्हणत बॉलिवूड उद्योगालाही धमकी देण्यात आली आहे.

आपली पद्धत बदला, नाहीतर तुमची अवस्था बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट होईल. ज्यांना आम्ही फोन केला आहे त्यांनी सरळ मार्गाने यावे, नाहीतर लपण्यासाठी जागाही उरणार नाही,' असे पोस्टमध्ये म्हटले आहे, पोस्टचा शेवट, 'एकच होता, एकच आहे आणि एकच राहील - लॉरेन्स बिश्नोई ग्रुप,' असे नमूद करण्यात आले आहे. या पोस्टमुळे यामागे बिश्नोई गँगचे कनेक्शन समोर येत असून, त्यानुसार तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर गुंडांनी शनिवारी रात्री गोळीबार केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. बिश्नोई गैंगकडून सोशल मीडियावर पोस्ट टाकतात, लगेच डिलीट करतात आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल करतात. त्यामुळे पोस्ट कुठून अपलोड झाली, हे शोधण्यासाठी आवश्यक असलेला यूआरएल आम्हाला मिळत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, गेल्या काही महिन्यांत बिश्नोई टोळीकडून बॉलिवूडमधील कोणालाही धमकीचे फोन आल्याची तक्रार मिळालेली नाही, असा दावाही एका अधिकाऱ्यांनी केला आहे.

बिश्नोई गँगने घडविलेले गोळीबार

- १४ एप्रिल २०२४ : वांद्रे परिसरातील अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईविरोधात गुन्हा दाखल आहे. अनमोल बिश्नोईने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती.

- १२ ऑक्टोबर २०२४: वांद्रे पूर्वेकडील खेरनगर परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात बिश्नोई गँगचा सहभाग समोर आला होता. याशिवाय प्रसिद्ध गायक सिद्ध मुसेवाला हत्या प्रकरणातही त्याचा सहभाग आहे.

Web Title : रोहित शेट्टी पर गोलीबारी के बाद बॉलीवुड को धमकी; बिश्नोई गिरोह ने ली जिम्मेदारी।

Web Summary : रोहित शेट्टी के आवास पर गोलीबारी के बाद, बिश्नोई गिरोह के एक फेसबुक पोस्ट ने जिम्मेदारी ली और बॉलीवुड उद्योग को धमकी दी। पोस्ट में मांगे पूरी न होने पर गंभीर परिणाम की चेतावनी दी गई, पिछली घटनाओं का हवाला दिया गया और गिरोह के प्रभुत्व का दावा किया गया।

Web Title : Bollywood threatened after Rohit Shetty shooting; Bishnoi gang claims responsibility.

Web Summary : Following the shooting at Rohit Shetty's residence, a Facebook post, purportedly from the Bishnoi gang, claimed responsibility and threatened the Bollywood industry. The post warned of dire consequences if demands aren't met, referencing past incidents and asserting the gang's dominance.