रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; आग्रा येथून एकाला अटक, दहशत निर्माण करायची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 06:14 IST2026-03-22T06:14:14+5:302026-03-22T06:14:14+5:30

उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँच यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली आहे.

firing at rohit shetty house case one arrested from agra | रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; आग्रा येथून एकाला अटक, दहशत निर्माण करायची योजना

रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; आग्रा येथून एकाला अटक, दहशत निर्माण करायची योजना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील ‘शेट्टी टॉवर’ या निवासस्थानी करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी प्रदीप शर्मा ऊर्फ गोलू याला आग्रा येथून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँच यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली आहे. १ फेब्रुवारी रोजी रात्री शेट्टी यांच्या निवासस्थानी गुन्हेगार शुभम लोणकर गँगच्या सूचनेवरून नागरिक आणि चित्रपटसृष्टीमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने गोळीबार करण्यात आला होता.

मुंबई क्राइम ब्रँचमध्ये विविध कलमांखाली या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. फरार आरोपींच्या शोधासाठी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. तांत्रिक विश्लेषण आणि पुरावे यांच्या आधारे मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश एसटीएफची मदत मागितली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आग्रा येथील पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.  

शनिवारी एसटीएफ आग्रा युनिट व मुंबई क्राइम ब्रँच यांच्या संयुक्त पथकाला माहिती संकलन करत असताना आरोपी प्रदीप शर्मा महावीरनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली. 

स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी योजना 

अटक केलेल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, शुभम लोणकर गँगच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहून, प्रभावित होऊन स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी योजना आखली होती. त्याचा साथीदार शिवम दुबे (आग्रा) याने या घटनेत सहभागी होण्यास सांगितले. त्यानंतर विष्णू कुशवाहा आणि दीपक यांनाही तयार करण्यात आले. दीपकने मुंबईला जाऊन शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केला.

या प्रकरणातील दीपक, विष्णू कुशवाहा आणि इतर पाच आरोपींना १५ फेब्रुवारी रोजी एसटीएफ व मुंबई क्राइम ब्रँचच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. सध्या अटक करण्यात आलेला आरोपी लपून राहत होता. 

अटक आरोपी प्रदीप शर्मा याला आग्रा पोलिस ठाण्यात नोंद करून न्यायालयात हजर करण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचकडे सुपुर्द केले. पुढील कायदेशीर कारवाई मुंबई क्राइम ब्रँचमार्फत केली जाणार आहे. दरम्यान, २०२५ मध्ये राजस्थानातील गंगानगर येथे आरोपीने  गोळीबार केला होता.  

 

Web Title : रोहित शेट्टी के घर पर गोलीबारी: आगरा में एक गिरफ्तार, दहशत फैलाने की साजिश

Web Summary : मुंबई में रोहित शेट्टी के आवास पर गोलीबारी के मामले में आगरा से एक व्यक्ति गिरफ्तार। शुभम लोनकर गिरोह से जुड़े आरोपी का मकसद दहशत फैलाना था। गिरफ्तारी उत्तर प्रदेश एसटीएफ और मुंबई क्राइम ब्रांच का संयुक्त अभियान था। साजिश का पर्दाफाश करने के लिए आगे की जांच जारी है।

Web Title : Rohit Shetty's House Firing: One Arrested in Agra, Conspiracy Revealed

Web Summary : One arrested in Agra for firing at Rohit Shetty's residence in Mumbai. The accused, linked to the Shubham Lonkar gang, aimed to create terror. The arrest was a joint operation by Uttar Pradesh STF and Mumbai Crime Branch. Further investigation is underway to uncover the full conspiracy.