किंग ऑफ केपसा म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'हॉटेल अफजलला आग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 00:33 IST2018-12-20T00:22:30+5:302018-12-20T00:33:49+5:30
मुंबई - माझगाव येथील बिर्याणीसाठी प्रसिद्द असलेल्या हॉटेल अफजलमध्ये आग लागली आहे. या आगाची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या दोन ...

किंग ऑफ केपसा म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'हॉटेल अफजलला आग'
मुंबई - माझगाव येथील बिर्याणीसाठी प्रसिद्द असलेल्या हॉटेल अफजलमध्ये आग लागली आहे. या आगाची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॉटेलमधील स्वयंपाक गृहाला ही आग लागली आहे.
अफजल हे हॉटेल बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे सातत्याने वर्दळ असते. बुधवारी रात्री 11.30 वाजता हॉटेलमधील किचनमध्ये सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर, या आगीने पेट घेतल्यामुळे ती वरील मजल्यापर्यंत पोहोचली. आगीचे वृत्त समजताच, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवताना काचेच्या खिडक्यांमुळे अडथळा येत होता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलिही जिवितहानी झाली नाही. पण, काही सामान जळून खाक झाले आहे.