वांद्रे पश्चिमेकडील इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लागलेली भीषण आग आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 17:04 IST2017-10-24T13:34:00+5:302017-10-24T17:04:39+5:30
वांद्रे पश्चिमेकडील रहिवासी इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे.

वांद्रे पश्चिमेकडील इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लागलेली भीषण आग आटोक्यात
मुंबई- वांद्रे पश्चिमेकडील रहिवासी इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. वांद्रेमधील माऊंट मेरी चर्चजवळ असलेल्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर आग लागली होती. 'ला मेर' इमारतीच्या तेराव्या मजल्यावर भीषण आग लागली होती.
दुपारी 12 वाजून 21 मिनीटांनी आग लागल्याचा फोन फायर ब्रिगेडला मिळाला होता. फायर ब्रिगेडने तात्काळा घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते आहे. इमारतीमधील फायर फायटिंग सिस्टम चालत नसल्याची नोटीस याआधी इमारतीला बजावण्यात आली होती. दरम्यान चार फायर इंजिन, 3 जम्बो टँकर आणि एका वॉटर टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे.
#Mumbai Fire broke out on the 13th floor of Lamer Building on Kadeshwari road in Bandra west;Fire tenders on the spot,no casualties reported
— ANI (@ANI) October 24, 2017
आग लागलेली इमारत ही एक हायप्रोफाइल इमारत असून याआधी तेथे सचिन तेंडुलकर आणि ऐश्वर्या रॉय-बच्चन राहत होते. दरम्यान, या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही.