ताडदेव येथे वेलिंग्टन हाईट्समध्ये लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 17:23 IST2018-07-16T16:52:00+5:302018-07-16T17:23:46+5:30
आग आटोक्यात आणून वीजविण्यात आली

ताडदेव येथे वेलिंग्टन हाईट्समध्ये लागली आग
मुंबई - मुंबई सेंट्रल येथील ताडदेव परिसरात तुळसीवाडी आरटीओ रोडवरील वेलिंग्टन हाईट्स या ३४ मजली गगनचुंबी इमारतीच्या २१ व्या मजल्यावरील एका घरात वॉशिंग मशीनने पेट घेतल्याने आग लागली होती. ही घटना आज दुपारी २. ३० वाजताच्या सुमारास लागली असून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते.
२१ व्या मजल्यावर घरात वॉशिंग मशीनमुळे लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तात्काळ मदतकार्य सुरु केले. त्यामुळे आगीवर नियंत्रण आणून विझविण्यात आली. आग विझविण्यासाठी घटनास्थळी ३ फायर इंजिन आणि २ वॉटर टॅंक पाठविण्यात आले होते.