दक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 15:37 IST2018-04-20T15:37:30+5:302018-04-20T15:37:51+5:30
भुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.

दक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडीजवळील शोरूमना भीषण आग
मुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील प्रेमसन्स हाऊसच्या मागील तीन गाळ्यांना शुक्रवारी दुपारी 2.49 वाजता आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी चार फायर इंजिन, एक वॉटर टँकर आणि एक रुग्णवाहिका दाखल झाली आहे. आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले असून, आगीचे नेमके अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, आगीत मोठी वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भुलाभाई देसाई मार्गावरील दाटीवाटीनं वसलेल्या दुकानांच्या गाळ्यांना ही आग लागली. लवकरच ही आग पसरल्यानं तीन गाळ्यांना आगीनं वेढलं. या आगीत काही गाळ्यांमधील सामानही खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून, आग पूर्णपणे विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पहिल्या मजल्यावरील 2500 स्क्वेअर फूटमध्ये असेलेल्या अॅडोनील्का आणि रुप्सेन्स या दोन दुकानांच्या मागे असेलेल्या गोडाऊनला आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या आणि एक बचाव पथक होते आशी माहिती फायर आधिकारी एस.डी सांवत यांनी लोकमतशी बोलताना दिली.