Fire on the third floor of the church chamber building in Colaba | कुलाब्यातील चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग 
कुलाब्यातील चर्चिल चेंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग 

ठळक मुद्देर्च चेंबरच्या तिसऱ्या मजल्यावर आज ही आग दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास लागली.घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून ६ ते ७ जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.

 

मुंबई -  कुलाबा येथील ताजमहल हॉटेलच्या मागे असलेल्या चर्च चेंबर इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. चर्च चेंबरच्या तिसऱ्या मजल्यावर आज ही आग दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून ६ ते ७ जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. अग्निशमन दलासोबत पोलीस देखील घटनास्थळी दाखल असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे प्रयत्न करत होते. चर्च चेंबर ही ४ मजली इमारत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं आहे. इमारतीच्या खिडक्या तोडून अग्निशमन जवानांनी इमारतीत अडकलेल्या ६ ते ७ जणांची सुखरूप सुटका केली आहे. आगीचं कारण शॉर्ट सर्किट असं म्हटलं जात आहे. मात्र, अग्निशमन दलाकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसून आगीचे नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे कळालेलं नाही.  


Web Title: Fire on the third floor of the church chamber building in Colaba
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.