Fire on the sixth floor of the Peninsula building in andheri west | अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग
अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

मुंबई : अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. 

पेनिन्सुला ही 22 मजल्यांची व्यवसायिक इमारत असल्याने यामध्ये अनेक कर्मचारी काम करत असतात. आग लागल्याने काहीजण आतमध्ये अकडले असल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून मदतीचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाने आतापर्यत 3 जणांची सुखरुप सुटका केली आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे.

English summary :
Mumbai: The fire broke out on the sixth floor of the Peninsula building in Andheri West, and four fire brigade vehicles arrived at the scene. Peninsula is a 22 floor commercial building with many employees working in it.


Web Title: Fire on the sixth floor of the Peninsula building in andheri west
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.