Fire at residential building near Dreamland Cinema in Mumbai | मुंबईत ड्रीमलँड सिनेमाजवळील रहिवासी इमारतीला आग, एकाचा मृत्यू

मुंबईत ड्रीमलँड सिनेमाजवळील रहिवासी इमारतीला आग, एकाचा मृत्यू

मुंबई - ग्रँटरोडमधील ड्रीमलँड सिनेमाजवळ असलेल्या शंतिनिकेतन या रहिवासी इमारतीला आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागली. दरम्यान, आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवानआठ गाड्या आणि पाण्याचे सहा बंबासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाच्या एका जवानासह दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ड्रीमलँड सिनेमाजवळ असलेल्या शांतिनिकेतन या इमारतील सकाळी सहाच्या सुमारास आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाने आठ गाड्या, आणि पाण्याच्या सहा गाड्यांसह आग शमवण्याचे कार्य सुरू केले. दरम्यान, इमारतीतून येत असलेल्या धुरामुळे आग विझवण्याच्या कामात अडथळे येत होते.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fire at residential building near Dreamland Cinema in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.