Fire Near BPCL Company's main entrance in mahul | बीपीसीएल कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी लागली आग

बीपीसीएल कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी लागली आग

ठळक मुद्देही आग आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास लागलीएअर कॉम्प्रेसरला ही आग लागली होती.बीपीसीएलच्या कर्मचार्‍यांनी ती विझवली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

मुंबई - ट्रॉम्बजवळील माहुल येथील शंकर मंदिराजवळ असलेल्या बीपीसीएल कंपनी मुख्य प्रवेशद्वारापाशी आग लागली. ही आह आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास लागली असून एअर कॉम्प्रेसरला ही आग लागली होती. मात्र, बीपीसीएलच्या कर्मचार्‍यांनी ती विझवली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. आग आटोक्यात आणण्याजोगी असल्याने कर्मचाऱ्यांनीच ती विझवली. या घटनेत अद्याप कोणीही जखमी असल्याची माहिती मिळालेली नाही. आगीनंतर धुराचे काळे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरले आहेत. २०१८ साली देखील बीपीसीएल कंपनीत भीषण आग लागली होती. 

Web Title: Fire Near BPCL Company's main entrance in mahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.