मुंबई - कुर्ला पश्चिमेतील स. गो. बर्वे मार्गावर असलेल्या मेहता इमारतीला लागलेली आग शमवण्यात अखेर अग्निशमन दलाला यश आले आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने 10 वाजल्यापासून आग शमवण्याचे काम सुरू केले. अखेरीस रात्री दीडच्या सुमारास आग नियंत्रणात आली, तर सव्वादोनच्या सुमारास आग पूर्णपणे शमवण्यात अग्निशमन दलाला यश आले.ऑ इमारतीमधून स्फोटाचे आवाज येत असल्याने रहिवाशांचे सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
कुर्ला येथील मेहता इमारतीला लागलेली भीषण आग अखेर नियंत्रणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 03:45 IST