दहिसरच्या कोविड रुग्णालयाला आग; आयसीयू केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विझविली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 07:31 PM2020-10-29T19:31:36+5:302020-10-29T19:31:49+5:30

Fire at covid hospital: दहिसर कांदरपाडा येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी १०० रुग्ण शय्या क्षमता असलेले अतिदक्षता उपचार केंद्र कार्यान्वित आहे.

Fire at Kovid Hospital in Dahisar; Extinguished by medical staff at the ICU center | दहिसरच्या कोविड रुग्णालयाला आग; आयसीयू केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विझविली

दहिसरच्या कोविड रुग्णालयाला आग; आयसीयू केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विझविली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - दहिसर, कांदरपाडा येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी कार्यरत असणाऱ्या अतिदक्षता केंद्रात गुरुवारी दुपारी आग लागण्याची घटना घडली. रुग्णाशेजारील वैद्यकीय संयंत्राला ही आग लागल्याने रुग्णालयात घबराट पसरली. मात्र तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून आग विझविली. यामुळे मोठा अनर्थ टळला. 

दहिसर कांदरपाडा येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी १०० रुग्ण शय्या क्षमता असलेले अतिदक्षता उपचार केंद्र कार्यान्वित आहे. त्याचे संचालन महापालिका करीत आहे. या केंद्रामध्ये एका रुग्णाशेजारी असलेल्या एचएफएनसी (हाय फ्लो नोझल कॅनूला) संयंत्राने गुरुवारी दु. २ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास पेट घेतला. त्यावेळी रुग्णाजवळ असलेल्या परिचारिका अनुपमा तिवारी यांनी क्षणार्धात संयंत्र रुग्णशय्येपासून दूर करून संयंत्राचा वीजपुरवठा खंडीत केला. 

तसेच इतर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी रवी, वॉर्डबॉय जतीन यांनी जवळच उपलब्ध असलेले अग्निरोधक उपकरण आणून पेटलेले वैद्यकीय संयंत्र विझवले. प्रसंगावधान राखून आग विझवल्याने पुढील दुर्घटना टळली. या परिचारिका, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंह चहल याांनी कौतुक केले.

Web Title: Fire at Kovid Hospital in Dahisar; Extinguished by medical staff at the ICU center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.