मुंबई - जोगेश्वरी येथील एस व्ही रोडवर असलेल्या मीनल टॉवरमध्ये १४ व्या मजल्यावर राहत्या घरात आग लागली आहे. ही आगीची घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांचे पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. आग किरकोळ स्वरूपाची असून आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे. या आगीत कोणीही जखमी झालेलं नसून आगीत घरातील वस्तूंचं नुकसान झालं आहे.
जोगेश्वरी येथे राहत्या घराला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 19:23 IST