मुंबई सेंट्रल येथे जिया इमारतीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 21:02 IST2018-01-05T13:51:01+5:302018-01-05T21:02:34+5:30
मुंबई सेंट्रलमध्ये जिया इमारतीला आग लागल्याचं वृत्त आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई सेंट्रल येथे जिया इमारतीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी
मुंबई : मुंबई सेंट्रलमध्ये जिया इमारतीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर ताबा मिळवण्यात यश आलं. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. इमारतीत अडकलेल्या एका व्यक्तीला आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास या सहा मजली इमारतीला आग लागली. आगीचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इमारतीच्या बेसमेंटला ही आग लागली. बेसमेंटला असलेल्या तीन दुकानांना ही आग लागल्याचं समजतं.