Join us

चेंबूर, कुरकुंभ एमआयडीसीमध्ये आगीच्या घटना; करोडोंचे नुकसान

By हेमंत बावकर | Updated: October 1, 2020 09:06 IST

Kurkumbh MIDC,Chembur Fire दोन्ही घटनांमध्ये जिवीतहानी झालेली नसली तरीही करोडोंचे नुकसान झाले आहे. 

मुंबई/पुणे : आज पहाटेच्या सुमारास मुंबई आणि पुण्यामध्ये आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये जिवीतहानी झालेली नसली तरीही करोडोंचे नुकसान झाले आहे. 

पहिल्या घटनेत चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेरील बाजारपेठेला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये काही दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशामक दलाचे 10 बंब घटनास्थळी आले होते. सकाळी उशिराने ही आग विझविण्यात आली. 

दुसऱ्या घटनेमध्ये पुण्याजवळील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. यामध्ये ही कंपनी जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीतही अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीचे आणि धुराचे लोळ आगीची दाहकता दाखवत होते. 

टॅग्स :आगअग्निशमन दलपुणे अग्निशामक दल