Join us
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूजवळ मालगाडीच्या डब्यांना भीषण आग, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 08:32 IST

डहाणू- वाणगाव हद्दीत मालगाडीच्या दोन डब्यांना भीषण आग लागल्यानं रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

मुंबई - मुंबई - डहाणू- वाणगाव हद्दीत मालगाडीच्या दोन डब्यांना भीषण आग लागली होती. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. गुरुवारी (8 नोव्हेंबर) रात्री उशिरा 10.30 वाजण्याच्या सुमारास डहाणू- वाणगाव या स्थानकांदरम्यान मालगाडीच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. सुरतहून जेएनपीटीकडे जात असताना या मालगाडीला आग लागली. दरम्यान, या घटनेमुळे गुजरात-मुंबईदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली असून,  लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय, गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या असून मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे. 

आगीनं रौद्ररुप केले धारणओव्हरहेड वायर तुटून तेल असलेल्या डब्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डब्यात प्लास्टिकचे ग्रेनील असल्याने आग झपाट्याने पसरत गेली. अथक प्रयत्न करत अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, ओव्हरहेड वायर आणि रुळाचे नुकसान झाले आहे. यामुळे डहाणू- विरार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. 

 

 

 

टॅग्स :पश्चिम रेल्वेलोकलआग