मुंबईत मेट्रो सिनेमाजवळील चमन चेंबरमध्ये आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 14:18 IST2023-08-09T14:18:28+5:302023-08-09T14:18:59+5:30
मुंबईत मेट्रो सिनेमाजवळील चमन चेंबर इमारतीमध्ये तळमजल्यावरील एका दुकानाला आग लागली आहे.

मुंबईत मेट्रो सिनेमाजवळील चमन चेंबरमध्ये आग
मुंबईत मेट्रो सिनेमाजवळील चमन चेंबर इमारतीमध्ये तळमजल्यावरील एका दुकानाला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील धोबी तलाव परिसरात मेट्रो सिनेमाजवळच असलेल्या इमारतीत ही घटना घडली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. इमारत रिकामी करण्यात आली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.