मुंबईत बेस्ट बसला भीषण आग, भर रस्त्यात अग्नितांडव; ड्रायव्हर-कंडक्टर बचावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 15:53 IST2023-12-09T15:47:36+5:302023-12-09T15:53:32+5:30
मुंबईच्या भायखळा येथे एका बेस्ट बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. भायखळ्याच्या जे.जे.उड्डाणपुलाजवळच ही घटना घडली.

मुंबईत बेस्ट बसला भीषण आग, भर रस्त्यात अग्नितांडव; ड्रायव्हर-कंडक्टर बचावले!
मुंबईच्या भायखळा येथे एका बेस्ट बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. भायखळ्याच्या जे.जे.उड्डाणपुलाजवळच ही घटना घडली. दरम्यान, बसला आग लागली तेव्हा बसमध्ये सुदैवाने प्रवासी नव्हते. फक्त बस चालक आणि कंडक्टर होते. दोघंही सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे. बस सांताक्रूझ आगाराची असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ आगारातील बस शनिवारी सकाळी ८.२० च्या सुमारास भायखळा येथील जे.जे.उड्डाणपुलाजवळ पोहोचली असता तिला आग लागली. आगीचं कारण कळू शकलेलं नाही. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचून आग विझवण्यात आली. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. बेस्टची बस मात्र जळून खाक झाली आहे.
VIDEO: मुंबईत भायखळा येथे बेस्ट बसला आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही pic.twitter.com/FtU6kkeFn1
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) December 9, 2023