'झिंग झिंग झिंगाट'च्या शूटिंगदरम्यान स्टुडिओत आग, आदेश बांदेकरांसह सर्व सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 16:19 IST2019-01-05T16:16:41+5:302019-01-05T16:19:40+5:30
घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून अभिनेता आदेश बांदेकर यांच्यासह सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'झिंग झिंग झिंगाट'च्या शूटिंगदरम्यान स्टुडिओत आग, आदेश बांदेकरांसह सर्व सुखरूप
ठळक मुद्देमालिकेच्या शूटिंगसाठी स्टुडिओत १०० ते १२५ जण होते. झिंग झिंग झिंगाट या मालिकेचे शूटिंग सुरु असताना ही आग लागली.
मुंबई - चेंबूर येथील एसेल स्टुडिओला आज दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. या आगीत झिंग झिंग झिंगाटच्या स्टेजचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून अभिनेता आदेश बांदेकर यांच्यासह सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चेंबूरमधील एसेल स्टुडिओमध्ये झिंग झिंग झिंगाट या मालिकेचे शूटिंग सुरु असताना ही आग लागली. या मालिकेच्या शूटिंगसाठी स्टुडिओत १०० ते १२५ जण होते. मात्र, आग लागल्यानंतर सर्वांना सुखरूप स्टुडिओबाहेर काढण्यात आले. या आगीत मालिकेच्या स्टेजचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
एसेल स्टुडिओला आग; झिंग झिंग झिंगाट मालिकेच्या स्टेजचे नुकसान
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 5, 2019