गोरेगावमध्ये गॅस गळतीमुळे आग; आगीत एकाचा मृत्यू
By सीमा महांगडे | Updated: June 26, 2023 22:26 IST2023-06-26T22:26:48+5:302023-06-26T22:26:48+5:30
मागील तीन दिवसांपासून मुंबईत दुर्घटनांचे सत्र सुरु आहे.

गोरेगावमध्ये गॅस गळतीमुळे आग; आगीत एकाचा मृत्यू
मुंबई : मागील तीन दिवसांपासून मुंबईत दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. सोमवारी गोरेगाव येथील गणेश रहिवासी सेवा मंडळ येथील एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हरिष चव्हाण (५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिस परेड पटांगणावरच ३९.६१ लाखांचा गांजा व ब्राऊन शुगर जाळून नष्ट
मुंबईत गोरेगाव पश्चिम येथे दुपारी पावणेबारा वाजताच्या सुमारास श्री गणेश रहिवासी सेवा मंडळ येथील एका घरात गॅस सिलेंडरचा भडका झाल्याने आग लागली. या आगीत एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला तात्काळ जवळच्या एचबीटी टॅामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित करण्यात आले.
दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी पोहचण्याआधीच काही वेळातच स्थानिक रहिवाशांकडून आग विजवण्यात आली. सदर घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.